Shyam Sundar Bishnoi RAS Success Story
esakal
Shyam Sundar Bishnoi Success Story : ध्येय निश्चित असेल आणि ते गाठण्याची जिद्द असेल, तर वाटेत मिळणाऱ्या अनेक संधीही त्या ध्येयापुढे छोट्या वाटू लागतात. राजस्थानमधील श्याम सुंदर बिश्नोई यांनी आपल्या मेहनतीतून आणि चिकाटीतून हेच सिद्ध करून दाखवले आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्याम सुंदर यांनी तब्बल ११ सरकारी नोकऱ्या मिळूनही त्या नाकारल्या. कारण, त्यांचे ध्येय एका मोठ्या पदाचे होते. अखेर ११ अपयशानंतर १२ व्या प्रयत्नात त्यांनी RAS परीक्षा उत्तीर्ण केली आणि SDM पदावर मजल मारली.