

Arunachal Pradesh Siang Project Protest Escalates Into Violence as CRPF Troops Are Deployed Amid Rising Opposition to the Dam
sakal
इटानगर/नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथे ११ हजार २०० मेगावॉट क्षमतेच्या प्रस्तावित सियांग बहुउद्देशीय प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) शीघ्र कृती दलाच्या (आरएएफ) दोन तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तुकड्यांमध्ये सुमारे २५० जवानांचा समावेश असून, त्यांना नवी मुंबईतून हवाई दलाच्या विमानाने पासीघाट येथे पाठविण्यात येणार आहे.