Karnataka : काँग्रेस सरकार कोसळणार? सिद्धरामय्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

एम. बी. पाटील यांच्या विधानाचा व्हिडिओ शेअर करत भाजपच्या कर्नाटक युनिटने काँग्रेसवर ताशेरे ओढले.
DK Shivakumar Siddaramaiah
DK Shivakumar Siddaramaiahesakal
Summary

सिद्धरामय्या पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहतील. सत्तावाटप किंवा काहीही असले असते तर आमच्या नेतृत्वानं तुम्हाला (मीडिया) सांगितलं असतं. असं काही नाही.

बंगळूर : कर्नाटकात सरकार स्थापनेपूर्वी सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डी. के. शिवकुमार यांच्यात काँग्रेस हायकमांडने ‘सत्तावाटप किंवा रोटेशनल सीएम’ व्यवस्थेची तजबीज केल्याची अटकळ असतानाच सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे विधान वरिष्ठमंत्री एम. बी. पाटील यांनी केले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अडीच वर्षांनी किंवा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, या सत्तावाटपाच्या चर्चा आणि अटकळ नाकारत मंत्री एम. बी. पाटील (M. B. Patil) यांनी सोमवारी संध्याकाळी सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे सांगितले. या विधानावर शिवकुमार यांनी प्रतिक्रिया द्यायची टाळली; मात्र हायकमांड याची काळजी घेतील, असे शिवकुमारांचे भाऊ आणि बंगळूर ग्रामीणचे खासदार डी. के. सुरेश यांनी सांगितले.

DK Shivakumar Siddaramaiah
Congress MLA : काँग्रेस आमदाराचा नादच खुळा! चक्क बैलगाडीवर स्वार होत गाठलं विधानसौध

सिद्धरामय्या पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहतील. सत्तावाटप किंवा काहीही असले असते तर आमच्या नेतृत्वानं तुम्हाला (मीडिया) सांगितलं असतं. असं काही नाही. आमच्या एआयसीसी सरचिटणीसांनी म्हटल्याप्रमाणे गोष्टी सुरूच आहेत, असं पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं. सोमवारी म्हैसूरमध्ये सिद्धरामय्या पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री असतील की सत्तावाटपाचा फॉर्म्युला आहे, या प्रश्नावर ते बोलत होते.

DK Shivakumar Siddaramaiah
Udayanraje Bhosale : आम्‍ही कधीच राजकारण केलं नाही, 'त्यांना' काळ्या यादीत टाका; उदयनराजेंचा स्पष्ट इशारा

भाजपचे काँग्रेसवर ताशेरे

एम. बी. पाटील यांच्या विधानाचा व्हिडिओ शेअर करत भाजपच्या कर्नाटक युनिटने काँग्रेसवर ताशेरे ओढले. डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार नाहीत. सिद्धरामय्या त्यांना होऊ देणार नाहीत. आतापर्यंतच्या सर्व घडामोडी पाहता बहुमत मिळूनही हे सरकार स्थिर होईल, अशी कोणतीही चिन्हे नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com