Siddheshwar Swami : चालता बोलता 'देव' गेला! सिद्धेश्वर स्वामींचं निधन; PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddheshwar Swami Passed Away

ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं सोमवारी निधन झालं.

Siddheshwar Swami : चालता बोलता 'देव' गेला! सिद्धेश्वर स्वामींचं निधन; PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Siddheshwar Swami Passed Away : ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी (Shri Siddheshwar Swami) यांचं सोमवारी निधन झालं. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं आज मंगळवार, 3 जानेवारीला विजयपुरा येथील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीये.

कर्नाटक सरकारनं (Karnataka Government) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारनं सिद्धेश्वर स्वामींचं अंतिम संस्कार राज्य सन्मानानं करण्याचा निर्णय घेतलाय. आज, मंगळवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वामीजींच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह (Narendra Modi) अन्य नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पाच वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कार नाकारल्यानंतर स्वामीजी प्रकाशझोतात आले होते. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून माहिती दिली होती.

हेही वाचा: BJP Strategy : भाजपसाठी 2022 ठरलं सर्वोत्कृष्ट; आता 2023 मध्ये पक्षाला 'या' 10 आव्हानांना सामोरं जावं लागणार!

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही स्वामीजींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिलंय, 'ज्ञानयोगाश्रम, विजयपूरचे संत श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. ते आपल्या प्रवचनातून मानवजातीच्या उद्धारासाठी प्रयत्न करत असत. त्यांची सेवा उत्कृष्ट आणि अतुलनीय आहे. स्वामीजींचं जाणं ही कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो.

पीएम मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी स्मरणात राहतील. त्यांनी इतरांच्या भल्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्यांच्या विद्वत्तापूर्ण आवेशासाठीही त्यांचा आदर केला गेला. या दुःखाच्या प्रसंगी माझी भावना त्यांच्या असंख्य भक्तांसोबत आहे.'