कोरोनाबाधितांना 100 टक्के बरे करणारे औषध आमच्याकडे; तामिळनाडू सरकारचा दावा

sidhha trratment is 100 percent effective on coronavirus said tamilnadu
sidhha trratment is 100 percent effective on coronavirus said tamilnadu

चेन्नई- देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक वैज्ञानिक या विषाणूवर प्रभावी ठरेल असे औषध किंवा लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. अशात तामीळनाडू सरकारने पारंपरिक सिद्धा उपचार पद्धतीने कोरोनाबाधित 100 टक्के बरा होऊ शकतो असा दावा केला आहे. सिद्धा उपचार पद्धतीने 25 कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे या उपचार पद्धतीचा वापर वाढवणार असल्याचंही तामिळनाडू सरकारकडून घोषीत करण्यात आलं आहे. 

सुखदायक! राज्यातील आतापर्यंत एवढे रुग्ण झाले बरे
तामिळनाडू सरकारमधील मंत्री के. पंडीराजन यांनी सिद्धा उपदार पद्धती 100 टक्के प्रभावी असल्याचं म्हटलं आहे. 'सिद्धा उपचार पद्धतीने रुग्ण 100 टक्के बरा होतो. आम्ही रुग्णांचा जीव धोक्यात घालत नाही. आम्ही सिद्धा, योगा आणि आयुर्वेद या तिन्ही पद्धतीचा वापर करत आहोत. या उपचार पद्धतीमागे जूना इतिहास आहे. लोकांचा यावर विश्वास आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर याचा वापर करण्यात येत आहे', असं पंडीराजन म्हणाले आहेत. 

अरे हे काय ! अकोल्यात चक्क कारागृहातील १८ कैद्याना कोरोनाची लागण
तामीळनाडू सरकारकडून या उपचार पद्धतीबद्दल विश्वास व्यक्त केला जात असला तरी या उपचार पद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या उपचार पद्धतीबाबत कोणताही शास्त्रीय अभ्यास करण्यात आलेला नाही. कोणत्याही उपचार पद्धतीला एका प्रकियेतून जाव लागतं. मात्र, सिद्धा उपचार पद्धतीबाबत असं काही करण्यात आलेलं नाही, असं म्हणत वैज्ञानिकांनी या उपचार पद्धतीवर शंका घेतली आहे. 

पंतजलीकडून मंगळवारी कोविड-19 वरील आयुर्वेदीक औषध बाजारात आणण्यात आलं आहे. तसेच या औषधाने कोरोनाबाधित रुग्ण 7 दिवसात बरा होत असल्याचा दावा योगगुरु बाबा रामदेव यांनी केला आहे. मात्र, आयुष मंत्रालयाने या औषधाचे सत्यापन होईपर्यंत जाहीरात न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी पारंपरिक उपचार पद्धती पुढे येत असल्याचं दिसत आहेत.

दक्षिण भारतामध्ये गेल्या अनेक शतकांपासून सिद्धा उपचार पद्धती रुग्णांना बरे करण्यासाठी वापरण्यात येत आहे. सिद्धा उपचार पद्धती आयुर्वेदासारखी वाटत असती तरी काही बाबतीत ती भिन्न आहे. वनऔषधी, धातू आणि जैविक रासायनिक संयुगे यांचा वापर करुन औषध बनवले जाते. तामिळनाडूमध्ये अनेक डॉक्टर ही उपचार पद्धती वापरत आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com