MP Sidhi Pee Case
MP Sidhi Pee CaseeSakal

Sidhi Pee Case : लघुशंका प्रकरणातील पीडित आदिवासी तरुणाचे मुख्यमंत्र्यांनी धुतले पाय; निवासस्थानी बोलवून केला सन्मान!

शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी पीडित तरुणाची माफी देखील मागितली.
Published on

मध्य प्रदेशातून दोन दिवसांपूर्वी एक संतापजनक घटना समोर आली होती. एका मद्यधुंद व्यक्तीने आदिवासी तरुणाला खाली बसवून त्याच्या अंगावर लघुशंका केली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित व्यक्तीचा सन्मान केला आहे.

गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी या तरुणाला भोपाळमध्ये आपल्या निवासस्थानी बोलावलं. यावेळी त्याला खुर्चीवर बसवून, मुख्यमंत्र्यांनी स्वतः खाली बसून त्याचे पाय धुतले. यानंतर त्या व्यक्तीचा टिळा लावून, हार घालून आणि शाल ओढून सन्मान करण्यात आला. यावेळी या आदिवासी तरुणाला श्रीगणेशाची एक प्रतिमा देखील भेट दिली.

MP Sidhi Pee Case
भाजप कार्यकर्त्याकडून आदिवासी तरुणाच्या अंगावर लघुशंका; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. याप्रकरणी दुःख व्यक्त करत त्यांनी या आदिवासी तरुणाची माफी देखील मागितली. जनता आपल्यासाठी देवासमान आहे, आणि जनतेची सुरक्षा हे माझं कर्तव्य आहे असंही चौहान यावेळी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीडित तरुणाची विचारपूस देखील केली. तो काय काम करतो, मुलांचं शिक्षण कसं सुरू आहे, त्यांना शिष्यवृत्ती मिळते का? असे प्रश्न त्यांनी या तरुणाला विचारले. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच त्याला न्याहरी देखील देण्यात आली.

राहुल गांधींची टीका

दरम्यान, या प्रकरणानंतर राहुल गांधींनी मध्य प्रदेश सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. या घटनेतील आरोपी देखील भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे, पक्षाची कोंडी झाली होती. भाजप सरकारच्या काळात राज्यातील आदिवासी नागरिकांवर होणारे अत्याचार वाढले आहेत, असं राहुल गांधी म्हणाले होते. दलित आणि आदिवासींबाबत द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी प्रवेश शुक्ला याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केलं आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं होतं, की शुक्लाच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आता शिवराज सिंह यांनी पीडित तरुणाला आपल्या घरी बोलावून सन्मान केेल्यामुळे, भाजप याप्रकरणी डॅमेज कंट्रोल करत असल्याचं म्हटलं जातंय.

MP Sidhi Pee Case
Mumbai : एकट्याने बोलण्याची हिंमत नाही का? उपमुख्याध्यापिकेने दिला भाजप आमदाराला दम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com