

Four police personnel caught on camera behaving irresponsibly inside Sidhi District Hospital, leading to suspension after viral video outrage.
esakal
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातून ज पोलीस दलाची मान शरमेने खाली जाणारी घटना समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हे कर्मचारी रुग्णांच्या खाटांवर झोपलेले आणि रुग्णालयाच्या आवारातच बेशिस्त वर्तन करताना दिसून आले आहेत. व्हिडिओमध्ये, या चार कर्मचाऱ्यांपैकी एक जण चक्क डस्टबिनमध्ये लघवी करतानाही दिसून आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. परिणामी, या प्रकरणात सहभागी असलेल्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.