esakal | कोरोना लस शोधणं झालं आणखी सोपं; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccination

कोरोना लस शोधणं झालं आणखी सोपं; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाचं संकट थैमान घालतंय. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट देखील अचानक आली आणि मोठं नुकसान देखील सोसावं लागलं. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर या संकटाला थोपवण्यासाठी सध्या लसीकरण हाच एकमेव मार्ग उपलब्ध आहे. भारतात सध्या ६ वेगवेगळ्या लशींच्या आपत्कालीन वापराला मंजूरी मिळाली आहे. यामध्ये कोविशील्ड, कोवॅक्सीन, स्पुटनिक व्ही, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना आणि झायडस कॅडिला या लशींचा समावेश आहे. देशात आतापर्यंत 64 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पार पडले आहे. सध्या सरकार लसीकरणाला आणखी गती देण्याच्या प्रयत्नात आहे. लोकांना लस मिळवण्यासाठी सोय व्हावी आणि सहजपणे ती उपलब्ध व्हावी, यासाठी आता एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे.

हेही वाचा: सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस - IMD

आता कोरोना लस तुमच्या आसपास कुठे उपलब्ध आहे, याबाबतची माहिती सहजगत्या गुगल या सर्च इंजिनवरुन मिळवता येणार आहे. आधी ही माहिती फक्त कोविन पोर्टलवरच उपलब्ध होती. मात्र, आता ती मिळणे फारच सोपं होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

हेही वाचा: Delhi Rain : धुवांधार पावसाने राजधानी तुंबली, रस्ते जलमय

कसे कराल सर्च?

  • गुगलवर 'covid vaccine near me' असं सर्च करा.

  • त्यानंतर लशींची उपलब्धता आणि इतर माहिती घ्या

  • त्यानंतर 'Book Appointment' हा पर्याय वापरा.

loading image
go to top