Sikkim Landslide
view of the landslide-hit area in Sikkim where heavy rain triggered a mudslide over an army campesakal

Sikkim Landslide : सिक्कीममध्ये पावसाचा कहर, आर्मी कॅम्पवर भुस्खलन,३ जणांचा मृत्यू; ९ जवान बेपत्ता, १५०० पर्यटक अडकले

Sikkim Landslide : रविवारी संध्याकाळी ७ वाजता उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील लष्करी छावणीत भूस्खलन झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात बांधलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत.
Published on

सिक्कीम: ईशान्य भारतात पावसाने कहर केला आहे. रविवारी संध्याकाळी सिक्कीममधील एका लष्करी छावणीत झालेल्या भूस्खलनात काही सैनिकांसह ३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. असे सांगण्यात येत आहे की ९ सैनिक देखील बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध सुरू आहे. प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com