

Simhastha 2028
esakal
मध्य प्रदेशातील धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेला आगामी 'सिंहस्थ कुंभमेळा २०२८' (Simhastha 2028) यावेळी पूर्णपणे हायटेक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची नुकतीच 'गुगल क्लाउड इंडिया'च्या (Google Cloud India) वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मध्य प्रदेशात उभारण्यात येणारे मेगा डेटा सेंटर आणि सिंहस्थ २०२८ च्या नियोजनात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय (AI - Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.