
Viral Video : शो सुरू असतानाच बुटातून पाणी पिऊ लागला फेमस गायक; कारण ऐकून थक्क व्हाल
पर्थ : ऑस्ट्रेलिया येथील एका सिंगरने शो सुरू असताना बुटातून पाणी पिल्याचा प्रकार घडला आहे. सगळ्या प्रेक्षकांसमोर हा प्रकार घडल्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. पण त्याने सर्व प्रेक्षकांसमोर असं का केलं हा प्रश्न आपल्यालाही पडला असेल. हैरी स्टाईल्स असं या सिंगरचं नाव आहे.
या सिंगरने का केलं असं?
स्टाईल या सिंगरने ऑस्ट्रेलियातील परंपरेला पुढे नेण्यासाठी हे कृत्य केलं आहे. बुटातून दारू पिणे ही तेथील परंपरा त्याने कायम ठेवली आहे असं सांगितलं जातंय. शो सुरू असताना त्याने प्रेक्षकांकडे उधार दारू मागितली होती. मी पाणी पिऊन शो करू शकतो का? का हे नियमांच्या विरोधात आहे? असंही त्याने प्रेक्षकांना विचारलं होतं.
पुढे बोलताना स्टाईल्स याने सांगितलं की, मला वेगळाच व्यक्ती असल्यासारखं वाटतंय. मला स्वता:चीच लाज वाटतीये. त्याला शो सुरू असताना दारू मिळाली नाही म्हणून त्याने बुटामध्ये पाणी टाकून पिलं आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू वॉर्नर यानेही बुटातून दारू प्यायली होती. त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तर आता स्टाईल याचासुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.