
जम्मू : ‘‘सायरनच्या आवाजाने आम्ही उठलो. काही क्षणांतच प्रचंड स्फोट झाल्याने आमचे घर हादरले. सायरनमुळे आम्ही वाचलो, ’’अशी भावना आज जम्मूतील रेहारी कॉलनीतील एका रहिवाशाने व्यक्त केली. आज पहाटे पाकिस्तानने जम्मू शहरातील काही भागांवर तोफगोळे आणि ड्रोन डागल्याने मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र सायरनमुळे जीवित हानी टळली.