esakal | सीताराम येचुरींना पुत्रशोक; कोरोनाने झालं निधन

बोलून बातमी शोधा

ashish sitaram yechuri

गुरुवारी सकाळी आशिष यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती सिताराम येच्युरींनी ट्विटरवरून दिली आहे.

सीताराम येचुरींना पुत्रशोक; कोरोनाने झालं निधन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम‌ येचुरी यांचे‌ चिरंजीव आशिष येचुरी (वय 34) यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. गुरूग्राममधील एक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सीताराम येचुरी यांनी ट्विट करून यासंबंधी माहिती दिली आहे. आशिष हे पत्रकार होते.

गुरुवारी सकाळी आशिष यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती सिताराम येचुरींनी ट्विटरवरून दिली आहे. गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आशिष यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्याआधी त्यांना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आली होतं. मात्र नंतर गुरुग्रामला हलवण्यात आलं.

हेही वाचा: कोरोनाच्या लाटेचे संकट ‘मोदीनिर्मित’; ममता बॅनर्जी

नवी दिल्लीतील एका वृत्तपत्रासाठी सिनियर कॉपी एडिटर म्हणून ते काम करत होते. सिताराम येचुरी यांनी ट्विटरवरून ही बातमी दिली. मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतरांचे त्यांनी आभारही मानले. सध्या सिताराम येचुरी हे होम क्वारंटाइन आहेत.