गंगा स्नानासाठी निघालेल्या ६ मित्रांचा अपघातात दुर्दैवी अंत, २ सख्ख्या भावांचा समावेश; सर्वांचं वय २० ते २३ वर्षे

Six Friends Killed in accident हरिद्वारला गंगा स्नानासाठी निघालेल्या या तरुणांच्या कारला सोमवारी पहाटे अपघात झाला. कार दुभाजकाला धडकून उलटली आणि त्यानंतर कारने पेट घेतला. यात सहा मित्रांचा मृत्यू झाला.
Six Friends Killed in Muzaffarnagar Accident on Way to Haridwar

Six Friends Killed in Muzaffarnagar Accident on Way to Haridwar

Esakal

Updated on: 

हरियाणातील हिसार जिल्ह्यातील सहा मित्रांचा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हरिद्वारला गंगा स्नानासाठी निघालेल्या या तरुणांच्या कारला सोमवारी पहाटे अपघात झाला. कार दुभाजकाला धडकून उलटली आणि त्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील सहाही तरुणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. या घटनेमुळे हरियाणातील राखीगढी आणि मोठ गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...