Highway Accident : राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात सहा जण ठार; कार, व्हीआरएल बस, कंटेनरची एकमेकांना जोराची धडक
Bijapur National Highway : सोलापूरहून येणारी मोटार आणि मुंबईहून बळ्ळारीकडे जाणारी बस आणि कंटेनरमध्ये हा अपघात झाला. मोटारीमधील चारही जण आणि बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर कंटेनरचालक गंभीर जखमी झाला.
बंगळूर : विजापूर जिल्ह्यातील मनगुळीजवळील राष्ट्रीय महामार्ग (National Highway Accident) क्रमांक ५० वर बुधवारी (ता. २१) सकाळी भीषण अपघात झाला. मोटार, व्हीआरएल खासगी बस आणि कंटेनर यांच्या तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.