

Young Woman Who Eloped Found Dead In Bhopal
Esakal
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये सेप्टिक टँकमध्ये एका बंद पेटीत मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. त्याची याआधी दोन लग्न झाली होती तर तिसऱ्यांदा महिलेशी लग्न केलं होतं. हत्या झालेल्या महिलेचं नाव अशरफी उर्फ सिया असं असून ती गोंदियाची आहे. आरोपी समीर खान याच्याशी इन्स्टाग्रामवरून तिची ओळख झाली होती.