

Healthy Monsoon Recipe: Rich and Creamy Amethi-Style Jaggery Kheer
esakal
उत्तर प्रदेश सरकारच्या 'एक जनपद-एक व्यंजन' (ODOP Cuisine) उपक्रमांतर्गत अमेठी जिल्ह्याची प्रसिद्ध गुळाची खीर आणि समोसा यांना अधिकृत पारंपरिक व्यंजन म्हणून मान्यता देण्यात आली आहे. गुळाची खीर ही केवळ चविष्टच नाही, तर पावसाळ्यात शरीराला ऊब देणारा आणि पौष्टिक असा पारंपरिक पदार्थ मानला जातो. गुळ, दूध आणि तांदूळ यांच्या संगमातून तयार होणारी ही खीर अनेक घरांमध्ये सण-उत्सव तसेच विशेष प्रसंगी आवर्जून बनवली जाते.