Viral: '30 दिवस 5 कैदयांसोबत...' 69 वर्षांनी समोर आलं त्या देशाचं सत्य!

कैद्यांनी मोठ्या आनंदात त्या प्रयोगाला संमती दिली होती. पण त्यांना माहिती नव्हतं की काय होणार आहे?
Sleep Experiment News:
Sleep Experiment News:esakal

Sleep Experiment News: जगभरामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव सातत्यानं नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात. त्यापैकी काही प्रयोग हे विशिष्ट कारणास्तव प्राण्यांवर केले जातात हे आपल्याला माहिती आहे. पण काही प्रयोग जाणीवपूर्वक माणसांवरही होतात. रशियामधील त्या प्रयोगाची साऱ्या जगभर चर्चा होती. आता आपण अशाच प्रयोगाविषयी जाणून घेणार आहोत जो माणसांवर करण्यात आला. त्यामुळे तो देश खूप ट्रोल झाला होता. ही गोष्ट आहे 1940 सालची. ज्यावेळी दुसरं महायुद्ध सुरु होतं. रशियातील शास्त्रज्ञ मात्र काही वेगळ्याच गोष्टीच्या शोधात होते.

रशियाच्या शास्त्रज्ञांना एका गोष्टीचा शोध घ्यायचा होता. तो म्हणजे एखादा माणूस झोपेशिवाय राहू शकेल का, त्याच्यावर होणारे परिणाम, हे सगळं त्यांना अभ्यासायचे होते. यासाठी त्यांनी पाच कैद्यांवर प्रयोग सुरु केले. त्यांना सांगितलं की, तुम्ही तीस दिवस काही झोपायचं नाही, तसं केलं तर तुम्हाला सोडून देण्यात येईल. आपल्याला फक्त झोपायचं नाही तेवढी गोष्ट केल्यावर घरी जायला मिळणार हे पाहून ते कैदी प्रयोगासाठी तयार झाले. मात्र त्यांना माहिती नव्हतं की पुढे काय होणार आहे...आता सुरु झाला होता रशियन स्लिप एक्सपिरेमेंट. यासाठी एक खास चेंबर तयार करण्यात आला. ज्यात त्या कैद्यांना ठेवलं जायचं. कैदी झोपू नये म्हणून एक विशिष्ट प्रकारचा गॅस सोडला जायचा. जेणेकरून ते झोपू नयेत.

Sleep Experiment News
Sleep Experiment News

कैद्यांचे पहिले पाच दिवस चांगले गेले. त्यानंतर मात्र ते थोडेसे थकलेले दिसू लागले. त्यांची प्रकृती खराब होऊ लागली. ते झोपण्याचा प्रयत्न करायचे मात्र त्या गॅसमुळे त्यांना काही झोप लागत नव्हती. नवव्या दिवशी गोष्ट फारच भयानक होती. पाचव्या क्रमांकाचा कैदी मोठ्यानं ओरडू लागला होता. शास्त्रज्ञ हे सारे पाहतच होते. दुसरे कैदी हे सारं पाहत होते. ते एका कोपऱ्यात शांतपणे बसून होते. त्यानंतर मात्र परिस्थिती आणखी बिकट झाली. बाराव्या - तेराव्या दिवशी तर कैदी मेले की काय असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला होता. अशावेळी शास्त्रज्ञांनी तो प्रयोग थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र कमांडर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

* आम्हाला बाहेर यायचे नाही....

जे आश्वासन देऊन कैद्यांना जिवंतपणी नरक यातना भोगाव्या लागत होत्या ते सहन न झाल्यानं त्यांनी आम्हाला बाहेर यायचेच नाही. आम्ही आतच बरे आहोत असा पवित्रा घेतला. पंधराव्या दिवशीच त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र आता परिस्थितीच वेगळी होती. काही करुन त्यांना तीस दिवस पूर्ण करायचे होते. तसे न केल्यास त्यांना गोळ्या घालून मारण्याचे आदेश होते. त्यातच शास्त्रज्ञांनी तो गॅस बंद केला. त्यानंतरच काही वेळातच त्या कैद्याचा मृत्यु झाला. त्याच्या शरिरावरुन मांस गायब होतं. केवळ हाडं दिसत होती. यानंतर शास्त्रज्ञांनी ठामपणे कमांडरला सुनावले की, हा प्रयोग बंदच करावा लागेल. अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील.

Sleep Experiment News
Sleep Experiment News

* शेवटी तो प्रयोग बंद झाला....

कमांडरनं शेवटी तो प्रयोग थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानं असं म्हटलं की, त्या शास्त्रज्ञांनी कैद्यांसोबत राहण्याची गरज आहे. जेणेकरुन त्यांना योग्य ते प्रयोग त्यांच्यावर करता येतील. मात्र शास्त्रज्ञांनी त्याला काही परवानगी दिली नाही. मग कमांडरनं विरोध करणाऱ्याला गोळ्या घातल्या. ते पाहून बाकीचे शास्त्रज्ञ घाबरुन गेले. कैदीही भांबावून गेले. हा सगळा काय प्रकार आहे त्यांना काही कळेना. जो कुणी एक कैदी राहिला होता त्याला पुन्हा त्या सोळाव्या क्रमांकाच्या चेंबरमध्ये टाकण्यात आले होते. शास्त्रज्ञाने त्याला काही प्रश्न विचारले. त्यानं दिलेली उत्तरं ही चक्रावून टाकणारी होती. वेगळीच बडबड करुन त्यानं त्या शास्त्रज्ञाची डोकेदुखी वाढवली. अखेर शास्त्रज्ञानं त्याला गोळ्या घालून ठार मारले. आणि तो प्रयोग बंद झाला.

Sleep Experiment News:
Viral News: महिलेचं जडलं चोरावर प्रेम...अन् खात्यातून गायब झाले ७० लाख

69 वर्षांनी सत्य आलं समोर...

त्या प्रयोगानंतर तब्बल 69 वर्षानंतर खरी गोष्ट समोर आली आहे. तोपर्यत अनेकजण त्याविषयी अंदाजच लावत होते. वेगवेगळ्या कल्पना करुन खरं काय असेल याविषयी तर्क बांधत होते. 2009 मध्ये Creepypasta नावाच्या एका वेबसाईनं एक आर्टिकल प्रसिद्ध केले. त्यात असे म्हटले होते की, ज्यावेळी ही गोष्ट साऱ्या देशासमोर आली तेव्हा त्या देशानं आपण असे काही केलं नसल्याचा दावा केला होता. मात्र त्या प्रयोगातून काही तथ्यं समोर आली होती. अनेकांचे असे म्हणणे होते की, ते खरं नाही. कित्येकांनी ती एक काल्पनिक कथा असल्याचे म्हटले होते. अजुनही त्यावर चर्चा सुरुच आहे.

Sleep Experiment News:
Viral Video: बापरे! पोलीस आले अन् मोबाईल चोरून निघून गेले...; पाहा व्हिडिओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com