
आजीचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या
दिल्ली : फेज-२ परिसरातील इलाबास गावात एका बांधकामाधीन घरात २८ डिसेंबर रोजी तीन वर्षांची मुलगी मृतावस्थेत आढळून आली होती. २५ डिसेंबर रोजी मुलीच्या आजीने फेज-२ पोलिस ठाण्यात मुलगी घरातून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी मुलीच्या खून प्रकरणी (small girl murder) हेमंत (वय ५०) याला अटक (accused arrested) केली. आजीच्या अवैध संबंधात नातीन अडसर ठरत असल्याने खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
पोलिसांना तपासादरम्यान हेमंत आणि मृत मुलीच्या आजीचे अनैतिक संबंध असल्याचे समजले. हेमंतला मुलीच्या आजीशी लग्न करायचे होते. मुलीचे वडील खुनाच्या गुन्ह्यात आधीच तुरुंगात आहे, तर आई तिला सोडून माहेरी गेली होती. अवैध संबंधात नातीनं अडसर ठरत असल्याने आजी आणि तिच्या प्रियकराने तिचा काटा काढण्याचे डीसीपी झोन-२ हरीश चंदर यांनी सांगितले.
हेही वाचा: राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक
घटनेच्या दिवशी हेमंत मुलीला घेऊन इलाबास गावाकडे निघाला होता. हेमंतने मुलीची हत्या (small girl murder) करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता. पोलिस मुलीच्या आजीच्या भूमिकेचा तपास करत असल्याचे हरीश चंदर यांनी सांगितले. खळबळजनक खून प्रकरण उघडकीस आणत पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक (accused arrested) केली. या हत्येतील आजीची भूमिकाही तपासली जात आहे.
Web Title: Small Girl Murder Accused Arrested Crime News Noida Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..