esakal | औषधे घ्यायचे विसरताय? मिळेल आता सूचना ;इचलकरंजीच्या निखिल पडतेंचे संशोधन
sakal

बोलून बातमी शोधा

Researcher Nikhil Padate

औषधे घ्यायचे विसरताय? मिळेल आता सूचना ; निखिल पडतेंचे संशोधन

sakal_logo
By
युवराज पाटील-सकाळ वृत्तसेवा

दानोळी (कोल्हापूर) : सातत्याने औषध घेणा-या रुग्णाची औषधे घेणे विसरण्याची चिंता मिटणार आहे. कारण इचलकरंजी येथील जंगस टेक्ऩॉलॉजीचे संशोधक निखिल पडते व त्यांच्या टीमने ‘स्मार्ट मेडिसीन डिस्पेन्सर’ हे देशातील पहिले नियमित औषधे घेण्यासंबंधीची उपकरण निर्माण केली आहे. जेष्ठ नागरीकांसह नियमित गोळ्या घेणा-या रुग्णांसाठी हे उपकरण म्हणजे घरातला डॉक्टरच ठरणार आहे. हि सिस्टीम रुग्णांना वेळच्या वेळी औषधे घेण्याची सूचना (अलार्म), त्यांची औषधे काढून देणे, औषधे घेतले न घेतलेचा संदेश संबंधीत केअर टेकर व डॉक्टर यांना पाठविण्याची व्यवस्था करणार आहे.

अनेक वेळा दररोज औषधे घेणा-या रुग्णांची वेळेत औषधे न घेतल्यामुळे नुकसान होते. जेष्ठ नागरीकांना तर त्याची फार अडचण होत असून कोणते औषध, कितीचा डोस याचीही गफलत होत असते. कोरोनासारख्या संसर्गजन्य साथीच्या काळात अलगीकरणाच्या काळात रुग्णाने कोणते, किती व कधी औषधे देणे यासाठीच्या अडचणी निर्माण होवू लागल्या. ती अडचण ह्या सिस्टीममुळे निकालात निघणार आहे.

हेही वाचा: दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव; तासात झालं होत्याचं नव्हतं

हि सिस्टीम रुग्णांना त्यांच्या वेळेनुसार औषधे घेण्याची सूचना देते. त्यांची औषधे काढून देते. रुग्णांचे नाव व फोटोसह डिसप्ले केले जाते. सिस्टीम संबंधीत रुग्णाचे केअर टेकर, कुटुंबिय, डॉक्टर व केमिस्ट यांच्याशी अॅपव्दारे जोडलेले असणार आहे. औषधांचा डोस कमी अधिक करण्याची सुविधा अॅपव्दारे करता येते. तसेच रुग्णाने औषधे घेतली, न घेतली असल्यास त्याचा संदेश सर्वाना जातो. त्यामुळे घरात कोणी नसले तरी औषधांचा फॉलोअप घेता येतो. अत्यंत कमी जागेत बसणारे व कमी किंमत असणारी हि सिस्टीम आहे.

डॉ. निखिल पडते, संशोधक

अनेकवेळा कुटुंबात जेष्ठ नागरीक असल्यास, कुटुंबिय इतरत्र असल्यास रुग्ण औषधे घेण्याचे विसरतात किंवा वेळा चुकतात. तसेच अलगीकरण झालेले रुग्ण यांना नियमित वेळेत औषधे देणे व योग्य डोस जाणे आवश्यक असते. ती गरज ओळखून हे उपकरण विकसित केले आहे. त्याचा उपयोग रुग्ण व नागरीकांना होणार आहे.

डॉक्टर, केमिस्टशी नेहमी संपर्कात

रुग्णाचे डॉक्टर व केमिस्ट यांच्याशी अॅपव्दारे नेहमी टच राहणार आहे. त्यामुळे नजीकचे केमिस्ट किंवा सुशिक्षित कुटुंबिय औषधे भरुन देणार आहेत. त्यामुळे औषधे भरण्याचीही चिंता मिटणार आहे.हे उपकरण कोणत्याही सॉफ्टवेअर कनेक्ट करता येणारे आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील काही अव्वल सॉफ्टवेअर कंपन्यांशी टायप करण्यात येणार आहे.

डॉ. पडते यांना सकाळचा यंग अचीव्हर्स पुरस्कार

डॉ. निखिल पडते यांना 2011 मध्ये सकाळ साप्ताहिकने यंग अचीव्हर्स व कोल्हापूर सकाळने नवसंकल्पक उद्योजक असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

loading image
go to top