

10 Thousand Crore 'SME Growth Fund' for Micro and Small Enterprises; Union Cabinet Approval
Sakal
नवी दिल्ली : देशातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या (SMEs) विकासाला आणि विस्ताराला गती देण्यासाठी केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपयांचा ‘एसएमई ग्रोथ फंड’ (SME Growth Fund) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निधीच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली. या निधीच्या माध्यमातून उत्पादन, सेवा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील उच्च क्षमता असलेल्या लघु व मध्यम उद्योगांमध्ये थेट इक्विटी (भागभांडवल) गुंतवणूक केली जाणार असून, जागतिक पातळीवर स्पर्धा करणारे भारतीय 'चॅम्पियन' उद्योग घडवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.