Narendra Modi: स्मृती इराणींनी चक्क मोदींच्या राजीनाम्यासाठी उपोषण केलं अन् भाजपमध्ये झाला राडा

स्मृती इराणी भाजपमध्ये होत्या तरीही त्यांनी मोदींनी राजीनामा द्यावा म्हणून आमरण उपोषणाची धमकी दिली होती
Smriti Irani 2004 demanding resignation Modi
Smriti Irani 2004 demanding resignation Modisakal

राहुल गांधी यांनी बुधवारी (दि.९ ऑगस्ट) रोजी संसदेत भाषण केले. भाषण संपल्यावर त्यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लावला. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली की राहुल गांधींनी फ्लाईंग किस करत संसदेचा आणि संसदेतल्या महिला खासदारांचा अपमान केलाय.

खासदारकी मिळाल्यानंतर अनेक दिवसांनी राहुल गांधी संसदेत बोलत होते. राहुल गांधी बोलत असताना प्रंचड गोधळ झाल्याचा पाहायला मिळाला. राहुल गांधींनी मणिपूरवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरु केला. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली असल्याचं ते म्हणाले. भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला.

मणिपुर मुद्द्यावर मोदी सरकारची बाजू सावरणाऱ्या नेत्यांमध्ये स्मृती इराणी या सर्वात आघाडीवर लढताना दिसत आहेत. पण गंमतीची गोष्ट म्हणजे याच स्मृती इराणी यांनी एकेकाळी मोदींच्या राजीनाम्यासाठी उपोषण केलं होतं.

Smriti Irani 2004 demanding resignation Modi
Flying Kiss Controversy:फ्लाईंग किसचा विषय काढत लक्ष विचलीत करायचा प्रयत्न ? कॉंग्रेसकडून स्मृती इराणींवर पलटवार

स्मृती इराणी यांचा जन्म 23 मार्च 1976 रोजी दिल्लीत मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील पंजाबी आणि आई बंगाली आहे. तीन भावंडांमध्ये स्मृती सर्वात मोठया होता. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी स्मृती यांनी दहावीनंतरच कामाला सुरुवात केली. त्या ब्युटी प्रोडक्ट्सची जाहिरात करायची आणि त्या बदल्यात दिवसाला 200 रुपये मिळवायची. 1998 मध्ये स्मृती 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी झाल्या होती, पण ती अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही. यानंतर स्मृतींनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्या नंतर मनोरंजन इंडस्ट्री ऑडिशन देऊ लागले. त्यावेळेस एकताच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून स्मृती इराणी सर्वांच्या घरोघरी पोचल्या. त्याशिवाय स्मृतीने डान्स रिअॅलिटी शो 'ये है जलवा' हा होस्ट केला होता. यानंतर प्रमोद महाजन यांच्या साह्याने स्मृती इराणी यांनी 2003 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

स्मृती इराणी यांनी 2004 मध्ये दिल्लीतील चांदनीचौक मतदारसंघातून कपिल सिब्बल यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. स्मृती इराणी यांचा त्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यानतंर त्यांना 2004 मध्ये त्यांना भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र युनिटचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर स्मृती इराणी यांनी असा निर्णय घेतला होता की, ज्यामुळे पक्षही अडचणीत आला होता. लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी त्यांनी नरेंद्र मोदींना जबाबदार धरले.

Smriti Irani 2004 demanding resignation Modi
No Confidance Motion : राहुल संसदेत बोलत असताना 'आई' पाठीशी! भाषणावेळी सोनिया गांधी सतत करत होत्या मार्गदर्शन

2004 मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांना धमकी दिली की, राजीनामा द्या नाहीतर मी आमरण उपोषण करेल. एका महिन्यानंतर लालकृष्ण अडवाणींच्या निवासस्थानी त्यांची आणि मोदींची भेट झाली. तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला ‘गुजरातची बेटी’ म्हटले आणि तेव्हापासून त्या शांत झाल्या आणि त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले. त्याचं वर्षी भाजप त्यांना युवा मोर्चाच्या महाराष्ट्र युनिटचे उपाध्यक्ष बनवले. त्यानंतर पाच वेळा भाजपच्या केंद्रीय समितीच्या कार्यकारिणी सदस्य झाल्या. 2010 मध्ये त्यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले. ऑक्टोबर 2011 मध्ये त्या गुजरातमधून राज्यसभेच्या सदस्य झाल्या.

Smriti Irani 2004 demanding resignation Modi
'त्यांचा' एकच गुन्हा की त्यांनी नरेंद्र मोदींना जन्म दिला; स्मृती इराणी AAP वर संतापल्या

2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्याचा पराभव झाला असला तरी त्यांनी राहुल गांधींना कडवे आव्हान दिले होते. परत 2019 लोकसभा निवडणूक मध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पारंपरिक अमेठी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उभ्या राहिल्या. आणि 38,449 मतांच्या फरकाने राहुल गांधीचा पराभव केला. विजयानंतर 43 व्या वर्षी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा स्मृती इराणी 2019 च्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com