'त्यांचा' एकच गुन्हा की त्यांनी नरेंद्र मोदींना जन्म दिला; स्मृती इराणी AAP वर संतापल्या

Narendra Modi With Mother
Narendra Modi With Mother

नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रमुख गोपाल इटालिया यांनी केलेल्या व्यक्तव्याचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये गोपाल इटालिया यांनी नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी वादग्रस्त टिप्पणी केल्याचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. Smriti Z Irani news in Marathi

Narendra Modi With Mother
MS Dhoni Statue: महेंद्रसिंग धोनीचा मेणाचा पुतळा व्हायरल, चाहते भडकले...

भाजप नेते अमित मालविय यांनी गोपाल इटालिया यांचा हा व्हिडीओ शेअर केला करत आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातच आता केंद्रीयमंत्री स्मृती इराणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करताना स्मृती इराणी यांनी शुक्रवारी म्हटलं की, "पंतप्रधानांच्या आईला शिवीगाळ केल्याने तुम्हाला गुजरातमध्ये राजकीय लोकप्रियता मिळेल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. या चुकीसाठी गुजरातची जनता तुम्हाला आगामी निवडणुकीत धडा शिकवेल.

केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच इटालियाने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप इराणी यांनी केला. त्यांनी दावा केला की गुजरातमधील 'आप' नेत्याने अनेक टिप्पण्या केल्या आहेत ज्यात त्यांनी हिंदू समाज आणि मंदिरात जाणाऱ्या महिलांचा अपमान केला आहे.

Narendra Modi With Mother
Gurmeet Ram Rahim: बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमचा पॅरोल अर्ज मंजूर

इराणी म्हणाल्या की, 100 वर्षांच्या हिराबाविरुद्ध आप नेत्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी करणे अक्षम्य चूक आहे, कारण त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. हिराबा यांची चूक एवढीच आहे, की त्यांनी नरेंद्र मोदींना जन्म दिला. तेच मोदी तुमच्या राजकारणाला धुळीत मिळवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com