Viral Video : टीव्ही अँकरचा टॉमॅटो दरवाढीवर प्रश्न अन् स्मृती इराणींनी करून दिली थेट तुरूंगाची आठवण

Smriti Irani
Smriti Irani Sakal

देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमती हा चर्चेचा विषय बनला आहे. यादरम्यान टोमॅटोचे गगनाला भिडलेले दर याबद्दल विचारण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी चांगल्याच भडकल्याचे पाहायला मिळाले. नॅशनल टीव्हीवर सुरू असलेल्या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी प्रसिद्ध टीव्ही अँकरला दिलेले उत्तर सध्या चर्चेत आहे. या लाईव्ह मुलाखतीची एक व्हिडिओ क्लीप शनिवारी व्हायरल झाली आहे.

इराणी यांना टोमॅटोचे दर 250-300 रुपये किलोवर गेले आहेत, तुमच्या घरात यावर चर्चा होते का? असा प्रश्न टीव्ही अँकरने विचारला. याला उत्तर देताना स्मृती इराणी तुम्ही या मुद्द्याचं महत्व कमी करत आहात असा आरोप केला. यावर अँकरने त्यांना आता तुम्ही यावर हे आधी व्हायचं आता होत नाही असं सांगाल, यावर चिडलेल्या इराणीने उत्तर दिले.

त्या म्हणाल्या की, मी देखील तुम्हाला विचारू शकते की तुम्ही तुरुंगात असताना काय झालं? आपल्याला जर मुक्त आणि मर्यादेत राहून चर्चा हवी असेल तर माझ्या घरात काय सुरू आहे ते सर्वजनिक चर्चेचा विषय नाहीये. तो माझ्या खाजगी आयुष्याचा भाग आहे असे उत्तर स्मृती इराणी यांनी दिलं.

Smriti Irani
Ajit Pawar News : प्रत्युत्तरच नव्हे तर शक्तिप्रदर्शनही! बीडमध्ये शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवारांची जोरदार तयारी

दरम्यान या व्हिडीओची क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासोबतट ट्वीटर सारख्या सोशल मीडियावर देखील स्मृती इराणी ट्रेंड होत आहेत. काँग्रेस सरकार सत्तेत असताना स्मृती इराणी यांनी महागाईच्या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केलं होतं. यानंतर आता देशात वाढत्या महागाईवर विरोधकांकडून स्मृती इराणींना सतात प्रश्न विचारले जातात. दरम्यान हा व्हिडीओ देखील काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून शेअर करण्यात आला आहे.

Smriti Irani
Chandrayaan-3 Update : चांद्रयानचं आणखी एक पाऊल पुढे! उरले फक्त २५ किमी; मॉड्यूलचे अंतिम डीबूस्टिंगही यशस्वी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com