
Smriti Irani’s Recent Statement Goes Viral : भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि अमेठीच्या माजी खासदार स्मृती इराणी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, त्यांच्या 'पॉलिटकली कमबॅक'ची हिंट दिल्याचं समोर आलं आहे. त्या म्हणाल्या की, भाजप २०२९मध्ये काय म्हणेल, हे ना मी जाणते ना आणि ना तुम्ही जाणता. भाजप २०२९मध्येच का म्हणेल, भाजप २०२६मध्ये काहीतरी म्हणाली किंवा...२०२५मध्येच काही म्हणाली तर...
तसेच, स्मृती इराणी म्हणाल्या, माझ्याबद्दल खूप चर्चा होत आहेत असं मला वाटतं. महौपार निवडणूक झाली तरी माझं नाव चर्चेत येईल, आमदरकीची निवडणूक, खासदारकीची निवडणूक झाली तरी माझं नाव येईल, कारण माझं नाव स्मृती इराणी आहे.
त्यांनी सांगितले की, ही राजकीय निवृत्तीची वेळ नाही. लोकांची कारकीर्द वयाच्या ४९ व्या वर्षी सुरू होते. मी तीन वेळा खासदार राहिले आहे. मी पाच खात्यांची मंत्रीही राहिलेली आहे, अजून तर बराच काळ चालेल. तसेच त्यांनी सांगितले की, पक्ष मला कधी आणि कुठे कोणती जबाबदारी देईल हे मला माहित नाही. मला एवढे माहित आहे की मी संसदेच्या माध्यमातून माझी क्षमता सिद्ध केली आहे.
याशिवाय त्या पुढे म्हणाल्या की, 'मी यूपीए सरकारच्या काळातही १० वर्षे राजकारण केले आहे. धरणे राजकारणात अनेकांनी माझे फोटोही पाहिले आहेत. मी १० वर्षे धरणे राजकारणही केले आहे, तुरुंगवासही भोगला आहे. अखिलेश यादव उत्तर प्रदेशात सत्तेत असतानाही मी अमेठीत काम केले आणि देशात यूपीए सत्तेत असताना मी अमेठीत निवडणूक लढवली.'
तसेच, त्यांनी अमेठीचा इतिहास सांगितला आणि म्हटले की अमेठी कधीही जिंकणारी जागा नव्हती, अमेठीत अनेक राजकीय दिग्गज हरले, शरद यादव हरले. गांधी कुटुंबातील मेनका गांधी स्वतः हरल्या. गांधी कुटुंबाने ती जागा निवडली कारण तिथले सामाजिक समीकरण असे होते, की जे काही मत दिले जाईल ते फक्त त्याच कुटुंबाला जाईल. म्हणून कोणताही समजूतदार राजकारणी अशी जागा निवडत नाही जिथे त्याचा पराभव निश्चित असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.