Smritika War Memorial: कॅन्टोन्मेंटच्या भिंतींवर जिवंत होणार लष्कराचा इतिहास;; पर्यटकांसाठी शो पूर्णपणे मोफत

Smritika War Memorial, Lucknow Light and Sound Show, Free Entry : लखनौ कॅन्टोन्मेंटमधील स्मृतिका वॉर मेमोरियल येथे ३५ मिनिटांचा लाइट अँड साउंड शो सुरू करण्यात आला आहे.
Light and sound show showcasing the history, valour and sacrifice of Indian soldiers at Smritika War Memorial in Lucknow.

Light and sound show showcasing the history, valour and sacrifice of Indian soldiers at Smritika War Memorial in Lucknow.

esakal

Updated on: 

ऐतिहासिक वारसा आणि प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या लखनौच्या पर्यटनाला आता आणखी एक नवे आकर्षण मिळाले आहे. लखनौ कॅन्टोन्मेंटमधील ‘स्मृतिका वॉर मेमोरियल’ येथे ३५ मिनिटांचा लाइट अँड साउंड शो सुरू करण्यात आला आहे. भारतीय जवानांचे शौर्य, पराक्रम आणि बलिदान प्रकाशयोजना, संगीत आणि प्रोजेक्शनच्या माध्यमातून या शोमध्ये सादर करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेश सरकार, उत्तर प्रदेश पर्यटन विकास महामंडळ (UPSTDC) आणि भारतीय लष्कराच्या मध्यवर्ती कमांडच्या संयुक्त विद्यमाने सुमारे ८.९५ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा शो नागरिक आणि पर्यटकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com