

Sneh Rana
sakal
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी महिला विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उत्तराखंडच्या स्नेह राणाला ५० लाख रुपये देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यमंत्री धामी यांनी स्नेह राणाशी फोनवर संवाद साधून विश्वचषकातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि भारतीय महिला क्रिकेट संघाला विजय मिळवून दिल्याबद्दल तिचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.