

Sonam Wangchuk Hunger Strike
ESakal
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात स्थलांतरित झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपला पहिला व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या उपवासाचा आज २५ वा दिवस असून त्यांचे वजन अंदाजे ११ किलोग्रॅम कमी झाले आहे. विद्यार्थ्यांवरील बळाचा वापर आणि त्यांच्यावर दाखल झालेल्या खटल्यांबाबत सरकारने आश्वासन दिल्यास त्या आजच उपोषण सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.