...म्हणून नवरी झाली विवाहापूर्वीच व्हायरल

वृत्तसंस्था
Tuesday, 29 September 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, सातत्याने रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे निवडक नागरिकांच्या उपस्थित विवाहसोहळे पार पडताना दिसतात.

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, सातत्याने रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे निवडक नागरिकांच्या उपस्थित विवाहसोहळे पार पडताना दिसतात. कोरोनापासून प्रत्येकजण काळजी घेताना दिसत असून, एका नवरीला हळद लावताना अंतर राखण्यासाठी रोलर ब्रशचा वापर केला. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, नवरी विवाहापूर्वीच चर्चेत आली आहे.

Video: कुत्र्याच्या पिल्लाचे घरात अनोखे स्वागत!

विवाह सोहळ्यांसाठी अटी घातल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग व कार्यालय सॅनिटाइज करणेही अनिवार्य आहे. कोरोनाच्या काळातही विवाह पार पडत असले तरी प्रत्येकजण काळजी घेताना दिसत आहे. कोरोना काळात हळदी समारंभाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, नवरी हळदी समारंभासाठी बसली आहे. एक महिला भिंतींना रंग देण्याचा रोलर ब्रश उचलते आणि नवरीला हळद लावते. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या महिला हसू लागतात. संबंधित मजेशीर व्हिडिओ पायल भयाना हिने ट्विटरवरून शेअर केला आहे.

दरम्यान, व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरेनासे होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हळद लावायला रोलर ब्रश आता मंगळसूत्र घालायला ड्रोन आणतील, अशी प्रतिक्रिया एका नेटिझन्सने नोंदवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social distancing bride haldi ceremony video viral