Buddhist Community
esakal
बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळणार
समाजकल्याण विभागाचा ६ ऑक्टोबर रोजीचा आदेश
सर्व शाळा व विभागांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
बंगळूर : राज्य सरकारने (Karnataka Government) अनुसूचित जातीतील व्यक्तींनी बौद्ध धर्म (Buddhist Community) स्वीकारल्यानंतरही त्यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्याचा आदेश जारी केला आहे. समाजकल्याण विभागाने सहा ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या या आदेशानुसार कर्नाटकातील १०१ अनुसूचित जातींच्या यादीतील कोणतीही व्यक्ती बौद्ध धर्म स्वीकारल्यास त्याला अनुसूचित जाती प्रमाणपत्र मिळणार आहे.