esakal | ...म्हणून गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली अन् सुरू केली शेती
sakal

बोलून बातमी शोधा

software engineer left his it job and doing farming in his village at karnataka

अमेरिकेतील आयटी कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी होती. सुख-सुविधा मिळत होत्या. पण, मन रमत नव्हते. अखेर नोकरी सोडली आणि शेती सुरू केली आहे. शेतीमध्ये मोठे समाधान मिळत आहे, असे सतीश कुमार यांनी सांगितले.

...म्हणून गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली अन् सुरू केली शेती

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कलबुर्गी (कर्नाटक): अमेरिकेतील आयटी कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी होती. सुख-सुविधा मिळत होत्या. पण, मन रमत नव्हते. अखेर नोकरी सोडली आणि शेती सुरू केली आहे. शेतीमध्ये मोठे समाधान मिळत आहे, असे सतीश कुमार यांनी सांगितले.

सतीश कुमार यांना अमेरिकेत लाखो रुपयांची नोकरी होती. पण, त्यांनी नोकरी सोडली आणि कलबुर्गी येथे येऊन शेती सुरू केली आहे. त्यांनी सांगितले की, 'अमेरिका आणि दुबईमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केले. अमेरिकेत मला वर्षाकाठी 1 लाख अमेरिकन डॉलर्स मिळत होते. पण, समाधान मिळत नव्हते. मला माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या होत्या त्यासाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे सगळं सोडून  गावी जाण्याचा निर्णय घेतला. 2 वर्षापूर्वी शेती सुरू केली. गेल्या महिन्यात मला 2 एकर जमिनीत केलेल्या शेतीतून 2.5 लाख रुपये मिळाले.'

दिवसभर शेतीमध्ये मोठ्या आनंदात काम करतो. शारिरीक व्यायाम होतो. शांत झोप लागते. शिवाय, कामाचे समाधानही मोठे आहे. यापेक्षा मोठे सुख कोणते असते. मायभूमीत येऊन टेन्शन फ्री जीवन जगत आहे, असेही सतीश कुमार यांनी सांगितले.

जम्बो कोविड सेंटरने भूक-भूक करून मारले हो...

loading image