काही लोक काळ्या जादुचा अवलंब करतायत; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prime Minister Narendra Modi

काही लोक काळ्या जादुचा अवलंब करतायत; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसकडून पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केलं होतं. आता यावर पंतप्रधान मोदींनी पाच दिवसांनी निशाणा साधला. तसेच काळ्या जादुचा उल्लेख करत टीका केली आहे. (Narendra Modi news in Marathi)

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटलं की, काही लोक काळ्या जादूचा अवलंब करतातय. ते निराशा आणि नकारात्मकतेत बुडलेले असतात. काळ्या जादूचा प्रचार करण्याचा प्रयत्न झाल्याचे आपण सर्वांनी 5 ऑगस्ट रोजी पाहिलं. या लोकांना वाटते की काळे कपडे परिधान केल्याने त्यांचा निराशेचा काळ संपेल, असही मोदींनी म्हटलं.

दरम्यान या लोकांना ठावूक नाही की, त्यांनी कितीही काळी जादू केली आणि अंधश्रद्धांवर विश्वास ठेवला, तरी भारतातील जनता त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाहीत, असंही मोदींनी म्हटलं.

काँग्रेसकडून ५ ऑगस्ट रोजी देशभर आंदोलन करण्यात आलं होतं. तर राजधानी दिल्लीत पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्याची घोषणा केली होती. यावेळी या आंदोलनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी सर्व नेत्यांनी काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला होता.