esakal | निवडून मानवाधिकाराचे मुद्दे उचलणारे देशाची प्रतिमा मलिन करताहेत - पंतप्रधान
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi

निवडून मानवाधिकाराचे मुद्दे उचलणारे देशाची प्रतिमा मलिन करताहेत - PM

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : देशात मानवाधिकाराचे मुद्दे निवडक पद्धतीने उपस्थित करणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली आहे. देशासाठी ही बाब प्रतिमा मलिन करणारी आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मोदी म्हणाले, "काही घटनांमध्ये काही लोकांना मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचं दिसून आलं पण याचसारख्या इतर घटनांमध्ये त्यांना ते दिसलं नाही. जेव्हा राजकीय चष्मातून आपण या घटनांकडे पाहतो तेव्हा मानवाधिकारांचं उल्लघन झालेलं असतं. याबाबत निवडक वागणं हे लोकशाहीसाठी नुकसानकारक आणि देशाची प्रतिमा मलिन करणारं आहे" आपल्याला अशा राजकारणापासून सावध रहायला हवं. मानवी हक्काबाबतच्या राजकारणापासून मानवाधिकार आयोगानं दूर राहून उपेक्षितांच्या हक्कांचं आणि आत्मसन्मानाचं संरक्षण करण्यावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षाही यावेळी मोदींनी व्यक्त केली.

भारत जगासाठी प्रेरणास्त्रोत राहिलाय

महात्मा गांधींचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक मार्गानं योगदान दिलं त्या बापूंकडं जग आज पाहत आहे. बापू मानवाधिकार आणि मानवी मुल्यांचं प्रतिक आहेत. गेल्या काही दशकांत अशा काही घटना घडल्या ज्यामध्ये जगाची भलामन झाली आणि त्याचा मार्ग चुकला. पण भारत कायमच मानवाधिकारांशी एकनिष्ठ राहिला.

महिलांसाठी आखली धोरणं

केंद्र सरकारनं अनेक महिलाप्रधान धोरणं राबवली. यामध्ये तिहेरी तलाक पद्धत संपुष्टात आणण्यात आली. त्याचबरोबर ज्या महिला काम करतात त्यांच्यासाठी २६ दिवसांची मॅटर्निटी लिव्ह सुरु करण्यात आली. तसेच गर्भपाताच्या कायद्यात सुधारणा करुन महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, असंही मोदी यावेळी म्हणाले. त्याचबरोबर महिलांविरोधातील गुन्हांसाठी कडक कायदे बनवले, हे खटले जलद गतीनं मार्गी लावण्यासाठी ६५० फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

loading image
go to top