काही राज्यांमध्ये आजपासून शाळा सुरू; संसर्गामुळे पालकांची अद्यापही तयारी नाही

वृत्तसंस्था
Monday, 21 September 2020

केंद्र सरकारने ‘अनलॉक’चे नियम जारी करताना नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग काही अटींसह सुरू करण्यास परवानगी दिली होती. आत्तापर्यंत केवळ मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाना याच तीन राज्यांनी शाळा सुरू करण्यासाठी तयारी दर्शविली आहे.

नवी दिल्ली - देशभर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही काही राज्यांमध्ये आजपासून (ता. २१) शाळा सुरू होत आहेत. केंद्र सरकारने ‘अनलॉक’चे नियम जारी करताना नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग काही अटींसह सुरू करण्यास परवानगी दिली होती. आत्तापर्यंत केवळ मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाना याच तीन राज्यांनी शाळा सुरू करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. या राज्यांमध्येही किमान ८० टक्के पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य प्रदेशात नववी ते बारावीपर्यंतच्या इयत्तांसाठी शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांची परवानगी आवश्‍यक करण्यात आली आहे. तसेच, विद्यार्थ्यांची वर्गात गर्दी होऊ नये म्हणून त्यांची विभागणी करून कमी संख्येचे वर्ग भरविले जाणार आहेत. राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी अनेक शाळांमध्ये विद्यार्थी येण्यास तयार नसल्याने त्या बंदच राहण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि हरियानामध्येही अशीच परिस्थिती आहे. हरियानात काही शहरांत राज्याने परवानगी दिली असली तरी स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याने गोंधळाची  स्थिती आहे.

शाळांचे नियम
    एका वर्गात १२ विद्यार्थी असतील
    विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने बोलाविणार
    नेहमीपेक्षा कमी वेळ शाळा असेल
    शिक्षकांना स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षेबाबत प्रशिक्षण
     शाळा दररोज सॅनिटाइज करणार
    शाळेत तापमान चाचणी रोज घेणार

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इतर काही राज्यांतील स्थिती
    छत्तीसगड : पालक तयार नाहीत
    गुजरात : दिवाळीपर्यंत शाळा उघडणार नाहीत
    बिहार : निवडणूक आणि छटपूजेनंतर निर्णय
    झारखंड : ३० सप्टेंबरपर्यंत बंदच ठेवणार
    उत्तर प्रदेश : सर्वेक्षण घेतल्यानंतर निर्णय
    महाराष्ट्र : ३० सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच.

एक ऑक्टोबरनंतर निर्णय घेतला जाणार

शिक्षकांचे म्हणणे
    विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणावर खूष
    शाळेत संसर्ग होणारच नाही, याची खात्री नाही
    सरकारने परवानगी दिल्यास काही अटींवर सुरू करता येणे शक्य

पालकांचे म्हणणे
    लस आल्यानंतर बघू
    ऑनलाइन शिक्षणाची सवय लागली आहे
    राज्याच्या नव्या सूचनांनंतर निर्णय घेता येईल

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In some states from tomorrow schools