'आरोग्य सेतू ऍप' डाउनलोड करत असाल तर, हे नक्की वाचा

वृत्तसंस्था
Wednesday, 10 June 2020

आरोग्य सेतू ऍप प्रमाणेच दिसणारे एक ऍप पाकिस्तानच्या काही हॅकर्सनी बनविले असल्याची माहिती मिळाली आहे. जेणेकरून या बनावट ऍपच्या माध्यमातून नागरिकांचा डेटा हॅक करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचे सायबर तज्ञांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उपद्रव वाढल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व जण मेहनत घेत आहेत. भारतात देखील केंद्र सरकारने आरोग्य सेतू नावाचे ऍप विकसित केले आहे. कोरोनाच्या खबरदारीसाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करू शकणारे हे ऍप देशातील सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्याची सूचना सरकारतर्फे जारी करण्यात आली होती. मात्र आता या आरोग्य सेतू ऍप प्रमाणेच दिसणारे एक ऍप पाकिस्तानच्या काही हॅकर्सनी बनविले असल्याची माहिती मिळाली आहे. जेणेकरून या बनावट ऍपच्या माध्यमातून नागरिकांचा डेटा हॅक करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचे सायबर तज्ञांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना विषाणूचा थैमान जगभरात थांबण्याचे नाव घेत नसल्याचे सध्या दिसून येत आहे. जानेवारीच्या सुरवातीला या विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगभर होण्यास सुरवात झाली. आता यास जवळ जवळ पाच महिने उलटले तरीदेखील, कोरोनाच्या विषाणूने अजूनतरी नांगी टाकलेली नाही. उलट याचा प्रादुर्भाव वाढतच चालला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी शास्त्रज्ञ, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या व अन्य सगळेच युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. देशात देखील केंद्र सरकारने आरोग्य सेतू नावाचे ऍप विकसित केले. मात्र या आरोग्य सेतू ऍपचे बनावट तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्र सरकारने कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून कोरोनाचे निदान झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर इतरांना सावधानतेचे निर्देश सूचित करणारे आरोग्य सेतू नावाचे ऍप विकसित केले होते. यानंतर देशभरातील लाखो लोकांनी हे ऍप आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड केले होते. त्यानंतर आता या ऍपची नकल करत पाकिस्तानच्या काही हॅकर्सनी आरोग्य सेतू ऍप सारखेच दिसणारे, एक खोटे आरोग्य सेतू ऍप तयार केले असल्याची माहिती मिळाली आहे. व हे नकली आरोग्य सेतू ऍप काही सोशल माध्यमांवरून देशातील लोकांना पाठविण्यात येत आहे. जर या प्रकारची कोणतीही आरोग्य सेतू ऍप संबंधित लिंक मोबाईलवर आल्या नंतर ती ओपन केल्यास तात्काळ मोबाईल मधील सर्व डेटा हॅक होण्याचा संभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य सेतू ऍप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावयाचे असल्यास, त्यांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरूनच घेण्याची सूचना सायबर सुरक्षा पोलिसांनी दिली आहे. या बनावट आरोग्य सेतू ऍपचे अँड्रॉइड अँप्लिकेशन .apk असे एक्सटेंशन आहे, तर ओरिजिनल आरोग्य सेतू ऍपचे एक्सटेंशन .org.in असे असल्याची माहिती सायबर सुरक्षा पोलिसांनी दिली आहे.      
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दोन दहशतवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात ११ ठार
-----------
धक्कादायक! आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू
----------
फेक बातम्यांच्या धर्तीवर सरकारच करणार आता फॅक्ट चेक; कसं ते वाचा?
-----------     
दरम्यान, देशात केंद्र सरकारने विकसित केलेल्या या आरोग्य सेतू ऍप संदर्भात मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे. हे ऍप सुरक्षित नसल्याचे काही जाणकारांचे मत आहे. अशातच देशातील प्रवासी विमान सेवा सुरु करताना सरकारने प्रवाशांना हे आरोग्य सेतू ऍप वापरणे अनिवार्य केले होते. आणि यापूर्वी देखील केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीत सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी काम करणाऱ्यांना आरोग्य सेतू ऍप वापरण्याचा सक्ती आदेश दिला होता. तसेच याच धर्तीवर सॉफ्टवेअर क्षेत्रातील गुगल आणि ॲपल या आघाडीच्या कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या खबरदारीसाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करू शकणारे एक्सपोजर नोटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणून सॉफ्टवेअर विकसित केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some things you must know before downloading the Aarogya Setu app

Tags
टॉपिकस
Topic Tags: