esakal | जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दोन दहशतवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात ११ ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Two terrorists have been killed in the encounter in Sugoo area of Shopian district

जम्मू-काश्मीरमध्ये आज (ता. १०) बुधवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये पुन्हा चकमक झाली आहे. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दोन दहशतवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात ११ ठार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आज (ता. १०) बुधवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये पुन्हा चकमक झाली आहे. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आठवड्याभरात झालेली ही तिसरी चकमक आहे. भारतीय जवनांनी दहशतवाद्यांना घेरले आहे असून चकमक अद्याप सुरुच असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीची आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी रविवारी आणि सोमवारी झालेल्या चकमकींमध्ये एकूण ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याने आठवड्याभरात एकू ११ दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे.

दरम्यान, पोलिस आणि लष्कराचे पथक आणि केंद्रीय राखीव सुरक्षा बल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त पथकाने आज (ता. १०) सकाळी ही कारवाई केली. या पथकाने शोपियाँ जिल्ह्यातील सुगू हेंदमा या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, या संयुक्त पथकाने संबंधित भागाला गराडा आणि सर्च ऑपरेशन सुरु केले. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
----------
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; आता घरोघरी होणार तपासणी
----------
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी (ता. ०८) सकाळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. शोपियाँ जिल्ह्यातील पिंजोरा भागात ही चकमक झाली होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू केल्यानंतर जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.