
पणजी : सोनाली फोगाट हिच्या हत्याप्रकरणाला आता नवे वळण लागले असून तिचा स्विय सहाय्यक असलेल्या सुधीर सांगवान याने गुरूग्राम येथे फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी सोनाली फोगाट हिला आपली पत्नी असल्याचं दाखवल्याचं समोर आलं आहे. दरम्यान सोनाली यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली तर सीबीआय चौकशी केली जाणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.
(Sonali Phogat Death Case Updates)
भारतीय जनता पार्टीची नेता आणि टिकटॉक अभिनेत्री सोनाली फोगाट हिचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यांच्या गूढ मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे तर मोठं षडयंत्र रचून झाल्याचा आरोप त्यांचे भाऊ रिंकू ढाका यांनी केलाय. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर आणखी एक नवी गोष्ट समोर आली आहे. सोनालीसोबत वर्षानुवर्षे बलात्काराच्या कट, ब्लॅकमेलिंग आणि स्लो पॉयझनिंगचा प्रकार सुरू होता अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी त्यांच्या स्विय सहाय्यकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान. सोनालीचा लहान भाऊ रिंकू ढाका हे हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील भूथनकला गावात राहतात. त्यांनी आपल्या बहिणीचा पीए सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्यावर सोनालीला तिच्या जेवणात मादक पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आणि व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे.