
Raja Raghuvanshi Murder Case : राजा रघुवंशी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या राज कुशवाहच्या आईने मंगळवारी (१० जून) एक मोठा खुलासा केला. तिने असाही दावा केला की तिचा मुलगा निर्दोष आहे आणि त्याला या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. बहुचर्चित घटनेचा कथित सूत्रधार राज कुशवाहाची आई म्हणाली की, राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्कारावरून घरी परतल्यानंतर तिचा मुलगा खूप रडला आणि तिने त्याचे सांत्वन केले.