
इंदौर येथील राजा रघुवंशी याची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशीने केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं आहे. तसेच, तिचा प्रियकर राज कुशवाह याच्यासह आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने सध्या देशभरात खळबळ उडाली असून, अनेकांकडून संताप व्यक्त होत आहे.