
इंदोरमधील चर्चित राजा रघुवंशी हत्याकांडात अटक केलेल्या चारही आरोपींनी पोलिस चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, राजाची पत्नी सोनम रघुवंशी ही या हत्येची सूत्रधार होती. सोनमने तिच्या पतीला मारण्यासाठी एक नाही तर दोन प्लॅन आखले होते. जर तिचे साथीदार त्याला मारू शकले नसते तर तिने ठरवले होते की ती सेल्फी काढण्याच्या बहाण्याने राजाला खड्ड्यात ढकलून मारेल.