मायनस 40 डिग्रीमध्ये सोनम वांगचूक करणार आंदोलन; व्हिडिओ पाहाल तर...: Sonam Wangchuk | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonam Wangchuk

Sonam Wangchuk: मायनस 40 डिग्रीमध्ये सोनम वांगचूक करणार आंदोलन; व्हिडिओ पाहाल तर...

लडाख : थ्री इडियट्स या सिनेमातील आमिर खानच्या भूमिकेमुळं प्रकाशझोतात आलेले लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे लडाखमधील कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणार आहेत. लडाखला ग्लेशिअर वितळत असल्यानं धोका आहे, त्यामुळं यापासून केंद्र सरकारनं राज्याला वाचवावं यासाठी ते आंदोलन असणार आहेत. (Sonam Wangchuk will protest in minus 40 degrees see trial video)

हेही वाचा: Dog calling Dog: शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याला 'कुत्रा' म्हटलं अन्...; तुमचाही उडेल थरकाप

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला घटनेच्या सहाव्या अनुसुचित सहभागी करण्याच्या मागणीनं वेग घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रविवारी एक व्हिडिओ शेअर केला असून केंद्राकडं हे लागू करण्याची मागणी केली आहे. आपली मागणी मान्य न झाल्यास पाच दिवसांच्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांचं आंदोलन २६ जानेवारीला सुरु होणार आहे. त्याचबरोबर आंदोलनाच्या घोषणेनंतर त्यांनी याची तयारी देखील सुरु केली आहे. या आंदोलनापूर्वी त्यांनी याची रंगीत तालिमही केली. याचा व्हिडिओ त्यांनी सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मायनस 20 डिग्री सेल्सिअस तापमानात रंगीत तालीम यशस्वी

वांगचुक यांनी ट्विट करत म्हटलं की, "एक टेस्ट रन यशस्वी. मायनस २० डिग्रीमध्ये सर्वकाही ठीक आहे. ही चाचणी मी माझ्या घराच्या छतावर करत आहे. माझं प्रत्यक्ष आंदोलन खारदुंगलामध्ये १८००० फुट उंचीवर मायनस ४० डिग्रीमध्ये होणार आहे. वांगचुक यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींना आवाहन केलं होतं की, लडाखला वाचवा. कारण एका अभ्यासात असं म्हटलंय की, इथले सुमारे दोन तृतीयांश ग्लेशिअर संपण्याच्या मार्गावर आहे. यामुळं लडाखमधील मुळ जमाती, उद्योग नष्ट होणार आहेत.

जिवंत राहिलो तर पुन्हा भेटू

सोनम वांगचुक यांनी आपल्या व्हिडिओत पंतप्रधान मोदी आणि शहा यांना आवाहन केलं की, लडाखबाबत उच्चस्तरावर तातडीनं कार्यवाही करा. पंतप्रधानांना माझं आवाहन आहे की, लडाख आणि अन्य हिमालयीन क्षेत्रांना वाचवण्यासाठी ठोस पावलं उचलावीत. मी २६ जानेवारीपासून पाच दिवसांच्या उपोषणाला बसणार आहे. जर मायनस ४० असणाऱ्या खादुर्ंगला इथं उपोषणादरम्यान मी वाचलो तर आपण पुन्हा भेटुयात.

हे ही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सोनम वांगचुक कोण आहेत?

सोनम वांगचुक यांचा जन्म १९६६ मध्ये झाला, ते एक मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. तसेच हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्स, लडाख (HIAL) याचे संचालक देखील आहेत. त्यांना सन २०१८ मध्ये मॅगेसेसे अॅवॉर्डही मिळाला आहे. २००९ मध्ये आलेल्या थ्री इडियट्स या सिनेमात आमिर खाननं साकारलेली भूमिका फुंगसुख वांगडू ही सोनम वांगचुक यांच्यावरच बेतलेली होती. वांगचुक यांनी लडाखमध्ये स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाक (SECMOL) बनवण्यासाठी ओळखले जातात.

टॅग्स :LadakhDesh news