युपीत सोन्याचा खजिना सापडला पण 'हा' आहे धोका

वृत्तसंस्था
Saturday, 22 February 2020

भारतातील सोन्याच्या साठ्याच्या पाचपटीहून अधिक सोने या खाणीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय) आणि उत्तर प्रदेश भूगर्भशास्त्र व खाण संचालनालय विभागाला या खाणी सापडल्या आहेत.

नवी दिल्ली : तब्बल दोन दशकांच्या शोध मोहिमेनंतर उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सोन्याच्या दोन खाणी सापडल्या आहेत. पण, याठिकाणी विषारी सापांची संख्या जास्त असल्याने खोदकामात अडचणी येणार हे निश्चित आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतातील सोन्याच्या साठ्याच्या पाचपटीहून अधिक सोने या खाणीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय) आणि उत्तर प्रदेश भूगर्भशास्त्र व खाण संचालनालय विभागाला या खाणी सापडल्या आहेत. या खाणींमधील सोन्याचा साठा जवळपास 3560 टन इतका आहे. हा साठा देशातील सध्याच्या सोन्याच्या साठ्याच्या पाचपट आहे. भारताचा सध्याचा सोन्याचा साठा जवळपास 626 टन इतका आहे. 

‘या खाणी भाडेतत्त्वार देण्यासंदर्भात सरकार विचार करते आहे. दोन ठिकाणी सोन्याचे साठे सापडले आहेत. सोनपहाड आणि हर्दी या दोन ठिकाणी हे साठे आहेत. जीएसआयच्या अंदाजानुसार सोनपहाड येथील सोन्याचा साठा 2913 टन इतका असून, हर्दी येथे 646 टन सोन्याचा साठा अपेक्षित आहे. या खाणींसाठी टेंडर काढण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सात सदस्यांच्या समितीकडे सोपविले आहे. ही समिती सोन्याच्या खाणींचे नकाशे बनवून पुढील प्रक्रिया करणार आहे. पण, याठिकाणी विषारी सापांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जगातील तीन प्रमुख विषारी जातींपैकी हे साप असून, या भागात त्यांची संख्या जास्त आहे. कोब्रा, करैत आणि रसेल वायपर हे तीन विषारी जातीचे हे साप आहेत. रसेल वायपर ही सापाची जात सोनभद्र जिल्ह्यातच आढळते. खोदकामापूर्वी वन विभागाकडून मिळणाऱ्या एनओसीमध्ये प्रत्यक्ष सापांची संख्या कळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonbhadra gold mine world most poisonous snakes