सोनिया गांधींनी आपल्याच तिजोरीतून तिस्ता सेटलवाडला दिले पैसे, भाजपचा आरोप

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तिजोरीतून तीस्ता सेटलवाड यांना वैयक्तिक वापरासाठी पैसे दिले होते
sambit patra v/s congress
sambit patra v/s congress
Summary

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तिजोरीतून तीस्ता सेटलवाड यांना वैयक्तिक वापरासाठी पैसे दिले होते

गुजरात सरकारने स्थापन केलेल्या (SIT) च्या अहवालात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाडा आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यासह इतरांनी गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यंमत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट रचला, अशी माहिती विशेष तपास पथकानं (SIT) शुक्रवारी सेशन्स कोर्टाला सांगितली आहे. दरम्यान, यासंदर्भात आता भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. (sambit patra criticized to congress)

तीस्ता सेटलवाड यांनी गुजरात सरकारला पाडण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना या प्रकरणात ओढण्यासाठी जे प्रयत्न केले ते काँग्रेसच्या सांगण्यावरून केले असून यासाठी काँग्रेसने तिस्ताला सुमारे 30 लाख रुपये दिले असल्याचा गंभीर आरोप पात्रा यांनी केला आहे. जे काही केले ते केवळ गुजरात आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी केले, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

sambit patra v/s congress
Gujarat riots: अहमद पटेलांसह इतरांनी रचला मोदींना अडकवण्याचा कट - SIT

पुढे ते म्हणाले की, सत्ता मिळवण्यासाठी हा सारा कट रचला असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या तिजोरीतून तीस्ता सेटलवाड यांना वैयक्तिक वापरासाठी पैसे दिले होते. ही खेळी अहमद पटेल यांची असली तरी यामागे खऱ्या सुत्रधार सोनिया गांधीच होत्या, असंही त्यांनी सांगितलं आहे. कारण त्यावेळी अहमद पटेल हे तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.

संबित पात्रा म्हणाले, या प्रकरणाशी संबंधित सर्व सूत्रधार रात्रीच्या अंधारात संजीव भट्ट, तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार अहमद पटेल यांच्या घरी भेटले होते. त्यानंतर गुजरात सरकार पाडून नरेंद्र मोदींची प्रतिमा डागाळावी यासाठी त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचीही भेट घेतली होती, असंही त्यांनी सांगितलं आहे.

sambit patra v/s congress
पुणे-बंगळुरु हायवेवर वाहतूककोंडी; चांदणी चौक ते वारजे पूलापर्यंत वाहनांच्या रांगा

एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी सेटलवाड सुरुवातीपासूनच या कटाचा भाग बनू होत्या. गोध्रा ट्रेनच्या घटनेनंतर काही दिवसांनी अहमद पटेल यांच्याशी त्यांची भेट झाली होती. पहिल्या घटनेसाठी त्यांना पाच लाख रुपये देण्यात आले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या सूचनेवरून या सर्व घडामोडी घडल्या आहेत.

शुक्रवारी एसआयटीने अहवालात दावा केला होता की, सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना 2002 मध्ये गुजरात सरकार अस्थिर करण्यासाठी काँग्रेसने पैसे दिले होता. 2002 च्या गोध्रा ट्रेन जाळण्याच्या घटनेनंतर सेटलवाड गुजरातमधील निवडून आलेले सरकार अस्थिर करण्यासाठी एक मोठा कट रचत होत्या. याशिवाय त्यांना प्रतिस्पर्धी राजकीय पक्षातील एका बड्या नेत्याची आर्थिक मदतही मिळाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com