Sonia Gandhi's childhood home in Italy to become a museum!
Sakal
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या इटलीतील बालपणीच्या घराचे लवकरच संग्रहालयात रूपांतर करण्याची तयारी सुरू आहे. इटलीस्थित शीख उद्योजक सुखदेवसिंग कांग यांनी सहा वर्षांपूर्वी हे ऐतिहासिक घर विकत घेतले असून, आता गांधी कुटुंबीयांची भेट घेऊन संग्रहालयासाठी दुर्मीळ छायाचित्रे, कागदपत्रे आणि आठवणींच्या वस्तू मिळवण्याची त्यांची इच्छा आहे.