सोनिया गांधी अ‍ॅक्शन मोडमध्ये; पराभवानंतर घेतला मोठा निर्णय

सोनिया गांधी यांनी हे आदेश दिले असून, लवकरच आणखी काही मोठे निर्णय होण्याची शक्यता.
Sonia Gandhi
Sonia GandhiTeam eSakal

दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना राजीनामे देण्यास सांगितलं आहे. प्रदेश काँग्रेसची पुनर्रचना करण्याच्या हेतूनं त्यांनी हे राजीनामे देण्यास सांगितल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना सांगितलं आहे. तसंच आणखी काही महत्वाची पावलं देखील काँग्रेस (Congresss) उचलणार असल्याची माहिती मिळतेय.

Sonia Gandhi
युपीत 304 जागांसह आम्हीच विजयी; अखिलेश यांचा दावा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल १० मार्चला जाहीर झाले. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सर्व निवडणूकांमध्ये काँग्रेसला (Congress) दारून पराभव स्विकारावा लागला आहे. एकूण पाच राज्यांत मिळून देखील काँग्रेसला शंभरी पार करता आलेली नाही. त्यानंतर पक्षाने काही मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सोनिया गांधींनी पंजाबचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू, उत्तर प्रदेशचे अजय लल्लू, उत्तराखंडचे गणेश गोदियाल, गोव्याचे गिरीष चोडणकर आणि मनिपुरच्या एन. लोकेन सिंह यांना राजीनामे मागितले आहेत.

Sonia Gandhi
कर्नाटक हायकोर्टानं दिलेल्या निकालावर राजकीय नेते म्हणतात; पाहा व्हिडीओ

पंजाब वगळता इतर सर्व राज्यांत देखील काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेस पंजाबमध्ये १७, उत्तराखंडमध्ये २५, उत्तरप्रदेशमध्ये २, मणिपूर ९ तर गोव्यात १२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेसला एकूण १०० जागा देखील मिळवता आलेल्या नाहीत. त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींनी काही महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com