सोनिया गांधींच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhis personal secretary charged with atrocities

सोनिया गांधींच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा (atrocities) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी २६ वर्षीय विधवा महिलेच्या तक्रारीवरून सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरुद्ध बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Sonia Gandhis personal secretary charged with atrocities)

आरोपीने नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. तसेच लग्नाचेही आश्वासन दिले होते, असे महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महिलेवर आरोपीने बलात्कार (atrocities) केला आणि या प्रकरणाची तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.

हेही वाचा: जयंत पाटील म्हणाले, हा महाविकास आघाडीला झटका नाही

२५ जून रोजी उत्तमनगर पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही तपास करीत आहे, असे द्वारकाचे पोलिस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले.

पोलिस एका ७१ वर्षीय व्यक्तीवर लावलेल्या आरोपांची चौकशी करीत आहे. जो एका वरिष्ठ राजकीय नेत्याचा खाजगी सचिव (personal secretary) म्हणून काम करीत होता. डीसीपीने राजकीय नेत्याचे नाव घेतले नसले तरी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की माधवनवर आरोप लावले गेले. महिला दिल्लीत राहते आणि तिच्या पतीचा २०२० मध्ये मृत्यू झाला. पती काँग्रेस पक्ष कार्यालयात काम करायचा. ते होर्डिंग्ज लावायचा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Sonia Gandhis Personal Secretary Charged With Atrocities

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sonia Gandhi
go to top