सोनिया आणि राहुल गांधींच्या चौकशीचे निर्देश 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 September 2019

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करणाऱ्या मानहानीच्या फिर्यादीप्रकरणी होणार चौकशी

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करणाऱ्या मानहानीच्या फिर्यादीप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे नेते राहुल गांधी यांची चौकशी करण्याचे निर्देश भोईवाडा न्यायालयाने नुकतेच दिले. 

कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर 2016 मध्ये सावरकरांबाबत आक्षेपार्ह शब्दांत ट्विट करण्यात आले होते. एकूण चार ट्विट प्रसिद्ध झाले होते. त्यात चित्रांचाही समावेश होता. सावरकर यांच्या भूमिकेबाबत हे ट्विट करण्यात आले होते. याविरोधात त्यांचे नातू रणजीत यांनी भोईवाडा दंडाधिकारी न्यायालयात तक्रार केली आहे.

या तक्रारीवर सुनावणी करताना न्यायालयाने शिवाजी पार्क पोलिस ठाण्याला हे आदेश दिले. या ट्विटमुळे सावरकर यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांच्या नीतिमूल्यांची अपप्रतिष्ठा होत आहे, असे रणजीत यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soniya and rahul gandh Inquiry Instructions