
सोनिया गांधींची ईडी चौकशी संपली, सोमवारी पुन्हा होणार चौकशी
नवी दिल्ली : सोनिया गांधींची ईडी चौकशी संपली असून ही चौकशी साधारण तीन तास चालली आहे. दुपारी बाराच्या सुमारास त्या ईडी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. त्यांतर त्यांना सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
(Soniya Gandhi Today's ED Enquiry Over)
तीन टप्प्यात त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्या वैयक्तिक व्यवहाराची चौकशी केली जाणार असून आज त्यांच्यासोबत प्रियांका गांधी सुद्धा उपस्थित होत्या. दरम्यान आज काँग्रेसकडून देशभर निदर्शने करण्यात आली आहेत. आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: काँग्रेस पक्षाची सर्व संपत्ती गांधी घराण्याच्या खिशात - रविशंकर प्रसाद
सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर काँग्रेस आणि भाजप नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रात्यारोप चालू झाले आहेत. भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी हा सत्याग्रह नसून दुराग्रह असल्याची टीका काँग्रेसवर केली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर हा राजकीय सूडाचा भाग आहे असं म्हणत यूपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी ईडीच्या या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला आहे. त्यानंतर काँग्रेसकडून देशभरात आंदोलने केली जात आहेत. हा सत्याग्रह असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर हा सत्याग्रह नसून दुराग्रह आहे असा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची सर्व संपत्ती ही गांधी घराण्याच्या खिशात असल्याचा आरोप भाजपचे रविशंकर प्रसाद यांच्याकडून केला जात आहे.
Web Title: Soniya Gandhi Ed Enquiry Over First Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..