esakal | सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न द्या; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

soniya gandhi and mayawati

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत यांनी मंगळवारी मोठं वक्तव्य केलंय

सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न द्या; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत यांनी मंगळवारी मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोनिया गांधी आणि मायावती दोन्ही प्रखर राजकीय व्यक्तीमत्व असल्याचं ते म्हणाले आहेत. हरीश रावत यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. 

आपल्या ट्विटमध्ये हरीश रावत म्हणालेत की, आदरणीय सोनिया गांधी आणि सन्मानीय मायावतीजी, दोन्हीही प्रखर राजकीय व्यक्तिमत्व आहेत. तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत किंवा असहमत असू शकता, पण तुम्ही या गोष्टींना नाकारू शकत नाही की त्यांनी भारतीय महिलांचा सन्मान, सामाजिक समर्पण आणि जनसेवेला एक नवी उंची मिळवून दिली आहे. आज त्यांच्याकडे भारताच्या नारीचे गौरवशाली स्वरुप म्हणून पाहिले जाते. मायावती यांनी वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात एका अद्भूत विश्वासाचा संचार केला आहे. भारत सरकारने या दोन्ही व्यक्तीमत्वांना भारत रत्न देऊन सन्मान करावे. 

ताजमहलसमोर फडकावला भगवा झेंडा, दिले जय श्रीरामचे नारे

हरीश रावत यांच्या ट्विटनंतर बसपाने प्रतिक्रिया दिली आहे. रावत यांची मागणी सार्वजनिक रुपात मुर्ख करण्याच्या राजकारणाशिवाय दुसरं काही नाही. काँग्रेसचे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वोच्च सन्मान देऊ शकला नाही. बसपाचे संस्थापक कांशीराम आणि मायावती यांच्यासह बसपा नेत्यांनी अशी मागणी केली होती. बसपा पुढे म्हणाली की, आम्ही कांशीराम यांना सन्मान देण्याची मागणी केली होती. पण, काँग्रेस सत्तेमध्ये होती, तेव्हा काहीही केलं नाही. आता ते सत्तेत नाहीत, तर अशी मागणी करत आहेत. 

भाजपनेही हरीश रावत यांना उत्तर दिलं आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भसीन म्हणाले की, ज्या लोकांवर कोर्टामध्ये खटले सुरु आहेत, अशा लोकांना सर्वोच्च सन्मान देऊन हरीश रावत जगासमोर काय उदाहरण ठेवू पाहात आहेत. जामीनावर असलेल्या लोकांना भारतरत्न देणे कितीपत योग्य आहे?

loading image