esakal | ताजमहलसमोर फडकावला भगवा झेंडा, दिले जय श्रीरामचे नारे
sakal

बोलून बातमी शोधा

taj mahal.

आग्रामधील ताजमहल परिसरात काही हिंदूवादी लोकांनी भगवा झेंडा फडकावल्याने खळबळ उडाली आहे.

ताजमहलसमोर फडकावला भगवा झेंडा, दिले जय श्रीरामचे नारे

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- आग्रामधील ताजमहल परिसरात काही हिंदूवादी लोकांनी भगवा झेंडा फडकावल्याने खळबळ उडाली आहे. हिंदूवादी कार्यकर्ते ताज महल परिसरात पोहोचले. ताजमहलसमोर असणाऱ्या एका बॅंचवर ते बसले, त्यानंतर त्यांनी आपल्या खिश्यातून भगवा झेंडा काढला आणि तो ताजमहलच्या समोर फडकावला. या कार्यकर्त्यांनी मोठ-मोठ्याने जय श्रीराम आणि हर हर महादेवचे नारे दिले.  

ताजमहल परिसरात तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी काही करण्याआधीच, या हिंदूवादी कार्यकर्त्यांनी ताजमहलसमोर भगवा भडकवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की हिंदूवादी नेते ताजमहल समोर भगवा झेंडा फडकावत आहेत, आणि जय श्री रामचे नारे देत आहेत. 

'केंद्र सरकारचा धाडसी निर्णय ! इथेनॉल निर्मिती प्रकल्पामध्ये 30 हजार...

सीआयएसफने ताजमहल परिसरात भगवा झेंडा फडकवणाऱ्या हिंदूवादी कार्यकर्त्यांना पकडे. त्यांना ताजगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सीआयएसफने दिलेल्या माहितीच्या आधारे ताजगंज पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांविरोधात धार्मिक भावना दुखावणे आणि गोंधळ निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार हिंदूवादी कार्यकर्ते भगवा झेंडा आपल्या खिश्यात घेऊन ताजमहलमध्ये घुसले होते. त्यानंतर रेड सँड स्टोन प्लॅटफॉर्मच्या खाली ठेवण्यात आलेल्या एका दगडाच्या बँचवर ते बसले. त्यानंतर त्यांनी आपल्या खिश्यातून भगवा झेंडा काढून फडकावला. त्यांनी हर हर महादेव आणि जय श्रीरामचे नारे दिले. त्यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

Long Kept Secret: इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ज्ञाच्या दाव्यानं उडाली एकच खळबळ

याप्रकरणी पोलिसांनी हिंदू युवा वाहिनीचा जिल्हा अध्यक्ष गौरव ठाकूर, सोनू बघेल, विशेष कुमार आणि ऋषी लवानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंदूवादी कार्यकर्ते गौरव ठाकूरने याआधी ताजमहलमध्ये शिव चालीसाचे पठण करणारा व्हिडिओ व्हायरल केला होता. पोलिस पुढील कार्यवाही करत आहेत.

loading image